*⚡मालवण ता.२५-:* भंडारी समाज महासंघाचे नवनिर्वाचित सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांचा ओम गणेश साई मंगल कार्यालय कट्टा येथे मालवण तालुक्यातील कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज यांच्यावतीने भंडारी समाजाचे जेष्ठ नेते माजी अध्यक्ष मामा माड्ये यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सचिव विकास वैद्य, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत करंगुटकर, स्वीकृत सदस्य निलेश गोवेकर, माजी जिल्हा सचिव राजु गवंडे ,भंडारी समाज कट्टा माजी युवा अध्यक्ष गणेश वाईरकर, मंगेश माडये, संजय नाईक, मामा बांदिवडेकर, निलेश हडकर, अशोक पराडकर, पूर्णानंद सरमळकर, श्याम आवळेगावकर, दीपिका म्हापणकर, विद्याधर चिंदरकर व इतर उपस्थित होते. समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्नशील राहावे, असे आवाहन करत आपण जिल्हाध्यक्ष म्हणून तुमच्या सर्वांच्या सोबत असू असे आश्वासन यावेळी रमण वायंगणकर यांनी दिले. तसेच समाजाच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यक्रम करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
