मत्स्य विभागाच्या पथकावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल…

मालवण दि प्रतिनिधी तीन दिवसांपूर्वी आचरा बंदरजेटीवर अवैद्य पर्ससीन जाळीद्वारे मासेमारी करणाऱ्या बोटींची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मत्स्य विभागाच्या पथकावर अज्ञातांनी केलेल्या हल्लाप्रकरणी पारंपारिक मच्छिमारांनी आवाज उठविल्यानंतर मस्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी उशिराने आचरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मालवणच्या मस्य विभागाचे परवाना अधिकारी मुरारी सत्यविजय भालेकर यांनी शुक्रवारी रात्री झालेल्या हल्लाप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार आचरा पोलीसानी अज्ञातांविरोधात  ३५३, ३३२, ३३६, १४३,१४७, १४९ महाराष्ट्र अधिनियम १९५१ प्रमाणे  ३७ (१), ३७ (३), १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा तपास आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील व हवालदार एम एम देसाई करत आहेत. आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी आपल्या फिर्यादीत म्हंटले आहे की आपण व सुरक्षा रक्षक शुभम कृष्णा राऊळ या समवेत दि 21 जानेवारी रोजी रात्री 11.30 च्या सुमारास आचरा पिरावाडी जेटी येथे अवैद्य पर्ससीन जाळीद्वारे मासेमारी करणाऱ्या बोटींची पाहणी करण्यासाठी गेलो असता रात्री 11.40 ते 11.50  च्या सुमारास जेटीवरील हायमस्टची लाईट बंद झाली याच मुदतीत सुमारे 20 ते 25 जणांचा जमाव आम्ही उभे असलेल्या ठिकाणी आला त्यातील दोन ते तीन इसमांनी  धक्काबुक्की करत इकडे थांबायचे नाही असे सांगून त्यातील एका इसमाने माझ्या उजव्या डोळ्यावर हाताच्या ठोशाने मारले जमावतील एकाने आमच्या समवेत असलेले मिमोह जाधव यांच्या उजव्या पायाच्या गुढग्यावर बसून दुखापत झाली शासकीय काम करत असताना 20 ते 25 जणांचा बेकायदेशीर जमाव जमून शासकीय कामात अडथळा आणला असल्याचे तक्रारी त म्हटले आहे मुरारी भालेकर यांना पोलीस संरक्षण परवाना अधिकारी मुरारी भालेकर याना हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संरक्षणासाठी पोलीस कर्मचारी दिला असल्याच्या माहितीला आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी दुजोरा दिला

You cannot copy content of this page