गोव्यात परिवर्तन होणार…

पालकमंत्री उदय सामंत यांचा विश्वास; उत्पल परिकरला तिकीट नाकारल्याने भाजपला फटका बसणार..

*⚡कुडाळ ता२५-:* माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात भाजपला चांगले दिवस दाखवले. त्यांच्याच मुलाला भाजपने तिकीट नाकारल्याने त्याचा फटका त्यांना यावेळी नक्कीच बसणार असून, शिवसेना राष्ट्रवादीला यश मिळेल आणि गोव्यात परिवर्तन घडेल असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

सिंधुदुर्गात ज्या प्रमाणे कुडाळ आणि देवगड मध्ये परिवर्तन घडले. त्याचप्रमाणे गोव्यात देखील यावेळी परिवर्तन घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने गोव्याची जबाबदारी देखील माझ्यावर आहे. जिल्ह्यात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये अगदी काही मतांनी आमच्या उमेदवारांचा पराभव झाला तर काही ईश्वरी चिठ्ठ्या आमच्या विरोधात गेल्या. या अपयशाचे आम्ही नक्कीच आत्मचिंतन करू असे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी बोलताना व्यक्त केले आहे

You cannot copy content of this page