रेडी हुडा येथील रमेश राणे यांचे उपोषण सुरू

सिंधुदुर्गनगरी ता २५ आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील रेडी हुडा येथील रमेश सगुण राणे यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

रेडी गावात काही लोक लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत असतानाही ते शासनाच्या धान्य योजनेचा लाभ घेत आहेत. लाखो रुपयांचे उत्पन्न असतानाही शासनाच्या योजनेचा लाभ घेत शासनाची फसवणूक करणाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी, रेडी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्या इमारतीत अन्य दुसऱ्याची नावे लावली आहेत. त्यामुळे संबंधितांवर योग्यती कारवाई करण्यात यावी, तसेच रेडी मायनिंग आणि मे मिनिरल्स अँड मेटल्स मुंबई या कंपन्यांकडून रेडी येथे खोल पर्यंत मायनींग उत्खनन करण्यात आले आहे. खोल उत्खणांमुळे समुद्रातील पाणी येथील भूगर्भात शिरून या पंचक्रोशीतील पाण्याचे साठे खारे होत आहेत. त्यामुळे येथील जमीन नापीक बनत आहे. तसेच भविष्यात हे गाव नष्ट होण्याशी शक्यता असल्याने मायनिंग हटाव रेडी गाव बचाव चा नारा देत रमेश राणे यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

You cannot copy content of this page