धनशक्तीला मतदारांनी नाकारले;आ दीपक केसरकर यांचा भाजपला टोला
*⚡सावंतवाडी ता.२२-:* ज्या नगरपंचायती मध्ये जास्त मतदार आहे. तिथे महाविकास आघाडीचा विजय झाला. परंतु जिथे कमी लोकसंख्या आहे. तेथे भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे कितीही धनशक्तीचा वापर झाला असला तरी महाविकास आघाडीने मोठे बालेकिल्ले काबीज केल्याचा दावा आमदार दिपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे बोलताना पुढे म्हणाले…
दोडामार्ग मध्ये वेळ देऊनही आम्ही विजयी होऊ शकलो नाही. हे नक्कीच दुर्दैवी असून, त्याचे आम्ही नक्कीच आत्मपरीक्षण करू असे मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. दोडामार्ग मधील रस्त्यांना निधी देऊनही ठेकेदारांमुळे हे रस्ते पूर्ण होऊ शकले नाहीत. परंतु, रस्त्याची कामे सद्य स्थितीत सुरू आहेत. दोडामार्ग मध्ये जरी आमचा पराभव झाला असला तरी देखील तेथील विकास कामांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. पुढील काळात एक विकसित शहर म्हणून दोडामार्ग ओळखले जाईल असे ते म्हणाले. यावेळी पराभवानंतर दोडामार्ग ची कार्यकारणी जरी बरखास्त करण्यात आली असली तरी देखील जुन्या काम करण्याऱ्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा कार्यकारणी मध्ये संधी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
