मालवण दि प्रतिनिधी आचरा हायस्कूल ची गरज ओळखून या हायस्कूलचे माजी विद्यार्थी आणि मुणगे गावचे रहिवासी अनिलकुमार मुणगेकर यांनी आचरा हायस्कूलला शुक्रवारी प्रिंटर भेट म्हणून दिला. यावेळी उपमुख्याध्यापक घुटूकडे, महाभोज, मुणगेकर याचे कुटूंबीय यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.
त्यांच्या या दात्रूत्वाबद्धल संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब, स्थानिक स्कूलकमेटी चेअरमन निलिमा सावंत, सदस्य अर्जुन बापर्डेकर, राजन पांगे,बाबाजी भिसळे, शंकर मिराशी,संजय पाटील आदींनी धन्यवाद व्यक्त केले आहेत.
