गाबीत फक्त वाटे घालत नाही तर रंगमंच देखील दणाणून सोडतात – जीजी चोडणकर

शिवसेनेकडून दशावतारी कलाकारांचा सन्मान

*⚡मालवण ता.२२-:* माझा हा दशावतार प्रवास इथवर येऊन पोहचण्याचे कारण म्हणजे एका कलाकाराने निरोप देताना म्हंटले की, गाबतांचे हे काम नव्हे गाबतांनी बांगडे मारावे आणि वाटे घालावे. मात्र गेली ३५ वर्षे दशावतारातून आपण रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. अनेक चढ उतार अनेक अडचणींवर मात केली. गाबीत फक्त वाटे घालत नाही तर रंगमंच देखील दणाणून सोडतात हे आपण दाखवून दिले, असे प्रतिपादन जेष्ठ दशावतारी कलाकार श्री. जीजी चोडणेकर यांनी देवबाग येथील कार्यक्रमात केले.

मालवण शिवसेनाच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त देवबाग पंचक्रोशीतील २५ दशावतार कलाकारांच्या सत्काराच्या कार्य्रक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देवबाग महापुरुष रंगमंच येथे झालेल्या या कार्यक्रमास शिवसेना नेता माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, शिवसेना जिल्हा समन्वयक भगवान लुडबे, मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, ज्येष्ठ दशावतारी कलाकार जीजी चोडणेकर, आबा कुर्ले, विलास वालावलकर, सिताकांत तांडेल, प्रसाद चव्हाण, उपविभाग प्रमुख अनिल केळुसकर आदी उपस्थित होते. यावेळी आनंद मेस्त्री, बाबा उपरकर , बाबू मांजरेकर, यशवंत मांजरेकर, विनोद देऊलकर, निलेश देऊलकर, मंगेश खोबरेकर, रुपेश लोंढे,सायबा केळुसकर, गिरिधर गावकर,रवी भांजी,विजय मालंडकर,भाऊ गोवेकर,गजानन मांजरेकर, जिजी राऊळ, महेश तांडेल, दिनेश राऊळ, नंदकिशोर कांदळगावकर, विजय चोपडेकर, तुषार चोपडेकर, विलास तांडेल, मुकेश कांदळगावकर, बाबी राऊळ,सिद्धेश देऊलकर, उमेश परुळेकर या दशावतारी कलाकारांना सन्मानित आले. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर म्हणाले, मालवण देवबागचे कलाकार हे अनोखे आहेत. झी टीव्हीने देखील त्यांची दखल घेऊन त्यांचा सत्कार केला. पूर्वीच्या काळी दशावतार कलाकारांना सहकार्य मिळत नव्हते. आज दशावतारी कलेला जनतेकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आपण घरात बसून देखील दशावतार पाहू शकतो. प्रशासनाकडून देखील पाठिंबा मिळत आहे. ही कला जपली पाहिजे, असेही ते म्हणाले.

You cannot copy content of this page