वैभववाडीत पात्र लाभार्थ्यांसाठी आयुष्मान भारत कार्ड केंद्र सुरू…

वैभववाडी प्रतिनिधी केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी,वैभववाडीत पात्र लाभार्थीसाठी आयुष्यमान भारत कार्ड केंद्र सुरू करण्यात आले आहे.असे वैभववाडी आयुष्यमान भारत योजनेचे आय टी प्रमुख किशोर दळवी यांनी म्हटले आहे. आयुष्यमान भारत योजनेचे मुख्य फायदे म्हणजे भारत सरकार कडून अधिकृत ५ लाखांचा आरोग्य विमा दरवर्षी असणार आहे.

या योजनेला वय व लिंग यावर कोणतीही मर्यादा व बंधन नाही.या मध्ये १३ हजार रुग्णालयांचा सहभाग आणि मोफत उपचार आहेत ,या योजनेत आसीयु / नॉन आसीयु, मेडीकल उपचार, हॉस्पीटालायजेशन निदान व उपचार, राहण्याची व जेवण व्यवस्था मोफत दिले जाईल. नोंदणी साठी पात्र लार्भाथ्यांना आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड दाखवणे आवश्यक आहे.लार्भाथ्यांना त्याच दिवसापासून विमा संरक्षण मिळेल.कोरोना प्रादुर्भावाने संलग्न आजारांना सुद्धा लार्भाथ्यांना संरक्षण आहे .यात हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारचे मेडिकल चेकअप सुध्दा उपलब्ध केले आहेत.लहान-मोठ्या १३५० पेक्षा जास्त आजारांवर मोफत उपचार होणार आहे. आयुष्यमान भारत कार्ड कॅशलेस सिंधुदुर्ग हॉस्पिटलची लिस्ट खालील प्रमाणे आहे.

जिल्हा रुग्णालय डी एच एस,डॉ. नागवेकर हॉस्पिटल आणि चॅरिटेबल ट्रस्ट, एन एच सी,गुरुकृपा हॉस्पिटल, जी के एच,सरकारी वैद्यकीय महाविद्यालय बांबुळी,गोवा, जी एम बी,आर एच वेंगुर्ला, व्ही एन जी एल,एस डीएच १०० कणकवली जि. एस के डी एस ,एस डी एच १०० सावंतवाडी जि. एस एस डी एस,एस डी एच ५० शिरोडा, एस डी एस एस. एस. पी. एम. मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटल, एसपीएम.पडवे,साईलीला हॉस्पिटल,साईल,संजीवनी बालरुग्णालय, एस जे बी ,संजीवनी हॉस्पिटल, एस एन जी आय ,सुयश हॉस्पिटल, एस. एस. एम.ई. या केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत रु ५ लाख विमा. लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी, आपले ओरिजनल आधार कार्ड / रेशन कार्ड, एक फोटो घेऊन आपण स्वतः साक्षी ऑनलाईन सर्व्हिसेस मु.पो.उंबर्डे.ता. वैभववाडी जि.सिंधुदुर्ग.वेळ : सकाळी १० ते ५ वा.संपर्क:पत्त्यावर संपर्क साधावा.अधिक माहितीसाठी 9421648429 यावर संपर्क साधावा.असे वैभववाडी आयुष्यमान भारत योजनेचे आय टी प्रमुख किशोर बळीराम दळवी यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

You cannot copy content of this page