रिद्धी हडकरला विश्वास;माजी नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्या हस्ते सत्कार
मालवण दि प्रतिनिधी शालेय जीवनापासूनच मालवणातील कबड्डीपटू आणि क्रीडा शिक्षकांचे आणि आई वडिलांनी सातत्याने दिलेले प्रोत्साहन , पाठींबा आणि मार्गदर्शन यामुळेच मी राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारू शकले आपल्या सर्वांच्या सदिच्छाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर खेळताना चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून मालवणचे नाव उज्वल करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू असे प्रतिपादन मालवणची सुकन्या, कबड्डीपटू रिद्धी नितीन हडकर हिने मालवण येथे बोलताना केले.
राष्ट्रीयस्तरावर होणाऱ्या १८ वर्षांवरील मुलींच्या गटात खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेसाठी मालवणची सुकन्या, कबड्डीपटू रिद्धी नितीन हडकर हिची महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल मालवण येथील आस्था ग्रुपतर्फे मालवणच्या भंडारी हायस्कुलमध्ये शुक्रवारी मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक मंदार केणी, सूर्यकांत फणसेकर, भंडारी हायस्कूलचे मुख्याध्यापक खोत, उत्तम पेडणेकर व्यासपीठावर होते. अजय शिंदे, मंदार ओरसकर, विद्या मेस्त्री, रामभाऊ पेडणेकर, अंतोन फर्नांडिस, रेनॉल्ड भूतेलो, शाम वारंग, निशीकांत पराडकर, जयसिंग पाटील, पंकज राणे, हरिश्चंद्र साळुंखे, नंदकिशोर महाजन, लोकमान्य सोसायटीचे वरिष्ठ शाखाधिकारी नितीन मांजरेकर, संजय शिंदे, मालवण स्पोर्टस् क्लबचे पप्पू परब, विक्रम मोरे, नंदू देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नरेश हुले, लारा मयेकर, माजी नगरसेवक आकांक्षा शिरपुटे, जयमाला मयेकर, बाळू नाटेकर, प्रसाद आडवणकर, ललीत चव्हाण, विकी नेवाळे, मिथील हिंदळेकर, मेघनाद बादेकर व आस्था ग्रुपचे बंटी केनवडेकर, मनोज चव्हाण, कुणाल मांजरेकर, उमेश शिरोडकर आदी उपस्थित होते. प्रारंभी आस्था ग्रुपचे अध्यक्ष उमेश मांजरेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर प्रास्ताविक हरी चव्हाण यांनी केले. मानपत्राचे वाचन भाऊ सामंत यांनी केले. यावेळी मंदार ओरसकर यांनी रिद्धीच्या यशाचा आलेख मांडताना मालवण रेवतळे येथील ज्येष्ठ कबड्डीपटू व प्रशिक्षक नितीन हडकर यांची रिद्धी ही कन्या. तिला लहानपणापासूनच कबड्डीची आवड येथील जय गणेश इंग्लिश स्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर रिद्धी मुंबईतील एम. डी. कॉलेजमध्ये अकरावीत शिकत आहे. शालेय स्पर्धांमध्ये कबड्डीत चुणूक दाखविणाऱ्या रिद्धीने वयाच्या अकराव्या वर्षापासून तालुका, जिल्हा, विभागीय तसेच राज्य कबड्डी स्पर्धांमध्ये आपल्या खेळाची छाप सोडली.
मुंबईत शिक्षण घेताना तिने मुंबई शहर, मुंबई झोन व राज्य कबड्डी स्पर्धांमध्ये सहभाग घेत उत्तम खेळाचे प्रदर्शन केल्याचे मंदार ओरोसकर यांनी सांगितले. तर महेश कांदळगावकर यांनी रिद्धीच्या यशात आई-वडिलांचा सहभाग मोठा आहे. तिने मालवणचे नाव अशाचप्रकारे अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले .यावेळी रिद्धी हडकर ही भविष्यात कबड्डीमध्ये मालवणचे नाव आणखी उंचावेल, यात शंकाच नाही, अशा शब्दांत तिचे मान्यवरांनी कौतुक केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौगंधराज बादेकर यांनी केले. शेवटी आभार भाऊ सामंत यांनी मानले. यावेळी शहरातील क्रीडा क्षेत्रातील सर्व संस्था आणि क्रीडाप्रेमी सहभागी झाले होते.
