युवावर्गाने औद्योगिक मानसिकता बाळगावी : कर्णिक

चिंदर येथे स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराला प्रतिसाद

मालवण दि प्रतिनिधी आपल्या समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत आपण लघु वा मध्यम उद्योग करण्यासाठी मदत व पूर्ण सहकार्य करु इथल्या बेरोजगार युवक युवतींनी फक्त उद्योग करण्याची मानसीकता आपल्यामध्ये बाळगावी असे प्रतिपादन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कर्णिक यांनी चिंदर येथे बोलताना केले मालवणचे माजी सभापती धोंडी चिंदरकर यांच्या संकल्पनेतून व चिंदर ग्रामपंचायत, जिल्हा खादी ग्रामोद्योग महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज सभागृह चिंदर ग्रामपंचायत येथे शुक्रवारी स्वंयरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्याला महिला बचत गट, सुशिक्षित बेरोजगार व नविन उद्योजक यांनी उपस्थित दर्शवली. कार्यक्रमाची सुरुवात सरपंच सौ. राजश्री कोदे व इतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने व छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन झाली. प्रास्तविक मा. धोंडी चिंदरकर यांनी केले यावेळी धोंडी चिंदरकर यांनी आपल्या गावातील बेरोजगार, बचतगट व युवा उद्योगजक यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व गावातील पुढची पिढी सक्षम व्हावी या उद्देशाने हा मेळावा भरविल्याचे सांगितले यावेळी बँक आँफ महाराष्ट्रचे संजय मिराशी , हडी सरपंच महेश मांजरेकर व नुतन जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी मार्गदर्शन केले. नुतन जिल्हा बँक संचालक बाबा परब यांचा यावेळी सरपंच उपसरपंच यांच्या हस्ते शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य दुर्वा पडवळ, स्वरा पालकर, सानिका चिंदरकर, खादी ग्रामोद्योगचे-प्रविण साळवी, संतोष भाईप, माळगाव सरपंच निलेश खोत, संतोष गांवकर, प्रकाश मेस्री, देवेंद्र हडकर, दिगंबर जाधव, आनंद पवार, अभय पाडावे एकनाथ पवार, मनिषा मसुरकर, दुर्वा चिंदरकर मोरेश्वर गोसावी, रणजित दत्तदास, विश्राम माळगांवकर, अजित पाडावे व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा समारोप ग्रामविस्तार अधीकारी श्री युवराज चव्हाण यांनी केला.।कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर यांनी केले.

You cannot copy content of this page