आमदार दीपक केसरकर : विरोधकांनी दहशतवादानेच जिल्हा बँक जिंकली
*⚡सावंतवाडी ता.२२-: दहशतवादाने जिल्हा बँक जरी विरोधकांनी जिंकली असली, तरी नगरपंचायत निवडणुकीमध्ये देवगड आणि कुडाळ येथील जनतेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच कोणीही कितीही सांगितली तरी विरोधकांचा दहशतवाद हाय कोर्टात सिद्ध झाला आहे. माझ्याकडे ज्यावेळी गृहखाते होते. त्यावेळी दहशतवाद करण्याची यांची हिमत कधी झाली नाही . अशी टीका आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
