डी वाय पाटील साखर कारखाना अधिकाऱ्यांना आश्वासन;जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी घेतली बैठक
सिंधुदुर्गनगरी -ता २१ उसपीक हंगाम दिड दोन महीन्यात संपणार असुन त्या अगोदर उस तोडला गेला नाही तर उस पीक शेतक-यांचे नुकसान होणार आहे.याबाबत जिल्हा बँक उपाध्यश अतुल काळसेकर यांची डि वाय पाटील साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जयदिप पाटील,शेती अधिकारी सुधीर पवार यांच्याशी चर्चा झाली.उस उत्पादक शेतक-यांशी चर्चा करून उस तोडीस सुरूवात करणार असल्याची ग्वाही यावेळी कारखाना अधिका-यांनी बँक उपाध्यश अतुल काळसेकर यांना दिली.
यावेळी बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अऩिरूध्द देसाई,कारखाना अधिकारी सुरेश यादव,बँक स्थायी अधिकारी एस एम यादव उपस्थीत होते. कणकवली ,वैभववाडी,तालुका व मालवण तालुक्यातील मसुरे व काळसे येथील उस उत्पादकांच्या प्रश्ना बाबात चर्चा करण्यात आली. करूळ व भुईबावडा हे दोन्ही घाट रस्ते खड्डे पडल्याने खराब झाले आहेत उस पीक नेणारी वाहने पलटी होत आहेत .वाहन चालक उस नेण्यास तयार नाहीत उस तोडी साठी कामगार येत नाहीत. उस सुकुन चालला आहे. या सर्वांवर तुर्तास तोडगा काढून शेतक-यांचा उस तोडून नेण्याची ग्वाही देण्यात आली. शेतक-यांचे नुकसान झाल्यास त्याचा थेट परिणाम बँकर्ज वसुलावर होणार आहे. सोसाट्यां मार्फत शेतक-यांना बँकेने कर्ज दिले आहे.याचा विचार व्हवा. मालवण तालुक्यातील मसुरे काळसे तुन चार हजार मे.टन उसाचे उत्पादन होते.तेथे उस तोड उशीरा होते कामगार नाही गाड्या उस न्यायला येत नाहीत.याबाबत चर्चा करण्यात आली.या सर्वावर तोडगा म्हनून एक छोटासा खांडसरी चा प्रोजेक्ट सुरू करता येईल का त्याला बँक सर्वोतोपरी मदत करेल.यासाठी एखादा उद्योजक जर पुढे आला तर बँक त्याच्या पाठीशी राहील.व हा प्रश्न सोडवता येईल याबत यावेळी चर्चा करण्यात आली.
