*⚡मालवण ता.०९-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल, मालवणच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
या परीक्षेत या स्कुलचा कु.अथर्व प्रसाद वालावलकर याने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इ.पाचवी) सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ वे स्थान मिळवले. कु. तन्वी सचिन दिघे (इ.नववी ) हिने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मालवण तालुक्यात तृतीय तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ वे स्थान मिळवले.तसेच कु.विनायक मोहन तांडेल याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३९ वा क्रमांक पटकावला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
