ओझर विद्यामंदिर आयोजित जिल्हास्तरीय हस्ताक्षर-शुद्धलेखन स्पर्धेत जान्हवी चव्हाण आणि गौरी भोसले प्रथम

*⚡मालवण ता.०९-:* मालवण तालुक्यातील ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेने शाळेच्या हिरकहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय हस्ताक्षर शुद्धलेखन स्पर्धेमध्ये पाचवी ते सातवीच्या गटामध्ये जान्हवी प्रमोद चव्हाण ( भंडारी हायस्कूल मालवण) हिने तर आठवी ते दहावीच्या गटामधून गौरी माधवराव भोसले(न्यू इंग्लिश स्कूल आचरा) हिने प्रथम क्रमांक पटकावला. पाचवी ते सातवीच्या गटातून द्वितीय – अस्मी प्रवीण पारकर (ओझर विद्यामंदिर कांदळगाव) तर तृतीय क्रमांक प्रथमेश प्रमोद चव्हाण( भंडारी हायस्कूल मालवण) आणि आठवी ते दहावीच्या गटामध्ये द्वितीय- गौतमी उदय घाडी (न्यू इंग्लिश स्कूल आचरा)तर तृतीय क्रमांक स्वरा संजय जाधव(न्यू इंग्लिश स्कूल आचरा) यांनी यश संपादन केले. न्यू इंग्लिश स्कूल आचरा, या माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आठवी ते दहावीच्या गटात तिन्ही क्रमांक मिळवून बाजी मारली.

ही स्पर्धा श्यामसुंदर कदम व भूषण सुर्वे यांनी प्रायोजित केली होती. स्पर्धेचे परीक्षण वसंत मेस्त्री सर यांनी केले. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये प्रशालेचे हस्ताक्षर प्रेमी शिक्षक अभय शेर्लेकर यांनी विशेष मेहनत घेतली. हस्ताक्षर-शुद्धलेखन स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या स्पर्धकांना पारितोषिक म्हणून रोख रक्कम आणि प्रमाणपत्र शाळेच्या हिरक महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमामध्ये देण्यात येणार आहे.

सर्व यशस्वी आणि सहभागी स्पर्धकांचे मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एस. परब, उपाध्यक्ष दिलीप राणे, सदस्य उदय परब, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रतापराव खोत, शालेय समिती अध्यक्ष किशोर नरे आणि स्पर्धा प्रमुख प्रवीण पारकर यांनी अभिनंदन केले आहे. संस्थेच्या आणि प्रशालेच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हिरकमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या सर्व जिल्हास्तरीय स्पर्धा नियोजनाप्रमाणे यशस्वीरित्या पूर्ण करता आल्या, असे प्रशालेचे मुख्याध्यापक प्रतापराव खोत यांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page