*⚡देवगड ता.०६-: भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान तर्फे २०२३ राज्यस्तरीय पुरस्कारचे वितरण भक्त कुणकेश्वर निवासस्थान येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याना यावेळी सन्मानित करण्यात आले.
आमदार अँड. अजित गोगटे यांना समाजरत्न पुरस्कार, डॉ.लहु आचरेकर यांना समाजभूषण, पोलीस स्थानक उदय शिरगावकर ( जीवन गौरव पुरस्कार), संतोष वालावकर शैक्षणिक कार्य (जीवन गौरव पुरस्कार) संतोष किंजवडेकर (जीवन गौरव पुरस्कार) पत्रकार वैभव केळकर उत्कृष्ट फोटोग्राफर (जीवन गौरव पुरस्कार) पोलीस हेड कॉन्स्टेबल. विठ्ठल जोशी (जीवन गौरव पुरस्कार) उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर (जीवन गौरव पुरस्कार) कोणकोण केशर गावचे सरपंच चंद्रकांत घाडी यांना कोरोना योद्धा व कुणकेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे यांना कोरोना योध्दा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
यावेळी आमदार गोगटे यांनी भोईर सामाजिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष दिनेश भोईर २००९ मध्ये बीएड शिकत असताना या ट्रस्टची निर्मिती केली त्याची आर्थिक परिस्थिती गरीब असताना सुद्धा त्यांनीं ‘दुर्बलांचे हित हेच आमच्या साध्य ‘या तत्त्वावर संस्था आरोग्य शिबीर नेत्र शिबीर, रक्तदान शिबीर शैक्षणिक मदत असे विविध उपयोगी उपक्रम राबवते. कोकणच्या मातीची जाण आहे. त्यामुळे देवगडात विविध उपक्रम राबवत असते .संस्थाला पुढील वाटचालीला शुभेच्छा.तसेच आम्ही सहकार्य नेहमीच करू या संस्थेला असे आपल्या भाषणात बोलले. डॉ श्री.लवू आचरेकर यांनी भोईर यांनी बीएड शिक्षण पंत वालावलकर कालेज येथे घेतली असता त्यावेळी मी शिक्षक होता माझा विद्यार्थी म्हणून हे कार्य करतो याचा मला अभिमान आहे त्याच्या पुढील वाटचालीला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा यावेळी संस्थापक अध्यक्ष दिनेश भोईर ,महिला अध्यक्ष सौ.दिशा दिनेश भोईर ,युवा कार्यकर्ता आराध्य दिनेश भोईर तसेच समस्त गावकरी व सत्कारमूर्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
