वेत्ये सहकारी सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी बिनविरोध

रमेश गांवकर पाचव्यांदा अध्यक्ष, यशवंत गांवकर उपाध्यक्ष; सेनेच्या ताब्यात आहे सोसायटी

*⚡सावंतवाडी ता.०६-: वेत्ये विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी निवडणूक बिनविरोध झाली. शिवसेना पुरस्कृत असलेल्या या सोसायटीच्या चेअरमन पदी माजी सभापती रमेश गावकर यांची तब्बल पाचव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमन म्हणून यशवंत गावकर यांची निवड झाली. वेत्ये येथील सोसायटीच्या कार्यालयात ही निवडणुक पार पडली.

यामध्ये संचालक पदी प्रकाश गावकर, मोहन गावकर नरेंद्र मिठबावकर रामा गावडे सुरेश सातार्डेकर कृष्णा पाटकर कृष्णा पेडणेकर तन्वी गावकर बिरु कोळेकर निर्मला गावकर प्रकाश जाधव आदींची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीम नीलांबरी वजराटकर यांनी काम पाहिले यावेळी गटसचिव अर्जुन गावकर उपस्थित होते. या निवडीनंतर माजी सरपंच सुनील गावडे यांनी नवनिर्वाचित चेअरमन श्री गावकर याचे निवासस्थानी जात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

You cannot copy content of this page