*⚡मालवण ता.०६-:* राज्यस्तरीय कला-उत्सव स्पर्धेत कट्टा येथील वराडकर हायस्कूलची विद्यार्थिनी कु. प्रतिक्षा मेस्त्री हिचा राज्यस्तरावर प्रथम क्रमांक आला. त्यामुळे तिची आता महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
मात्र तिची घरची परिस्थिती बेताची असल्याने तिला या स्पर्धेसाठी आर्थिक मदत आवश्यक होती. वराडकर हायस्कुलचे बहुतेक माजी विद्यार्थी असलेला आभाळमाया हा ग्रुप प्रतिक्षाच्या मदतीला धावून आला असून तिला आर्थिक मदत केली. आभाळमाया ग्रुपतर्फे मालवण तालुक्यात सामाजिक स्तरावर अनेक गरजू रुग्ण आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत होत असते. कु. प्रतीक्षाला तिच्या घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे स्पर्धेसाठी येणाऱ्या अडचणीबाबत सचिव सुनील नाईक यांनी विनंती केल्यामुळे या स्पर्धेसाठी आभाळमाया ग्रुपने आर्थिक मदतीचा भार उचलून प्रतिक्षाला राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करायची संधी दिली. या ग्रुपचे सदस्य अमित चव्हाण, राकेश डगरे यांनी ग्रुपच्या वतीने कु. प्रतिक्षाला आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रतिक्षाचे मार्गदर्शक शिक्षक समीर चांदरकर आणि प्रतिक्षाचे पालक उपस्थित होते.
