वाजपेयी यांना काव्यांजलीतून अनोखी श्रद्धांजली

*⚡वेंगुर्ला ता.२९-:* भाजपा वेंगुर्ल्याच्यावतीने आयोजित केलेल्या ‘काव्यांजली‘ या कार्यक्रमात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचे वाचन करुन त्यांना अनोखी श्रद्धांजली देण्यात आली.

वेंगुर्ला येथील आनंदयात्री वाङ्मय मंडळ, बॅ.खर्डेकर महाविद्यालय, वेताळ प्रतिष्ठान, किरात ट्रस्ट, नगरवाचनालय आदी संस्थांच्या सहभागाने कॅम्प येथील घोडेबाव गार्डनमध्ये खुल्या रंगमंचावर झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमात शैलेश जामदार, पांडुरंग कौलापुरे, प्रतिक्षा भगत, प्रा.पी.जी.देसाई, फाल्गुनी नार्वेकर, वासुदेव पेडणेकर, प्रा.आनंद बांदेकर, संजय पाटील, संजय पुनाळेकर, अवधूत नाईक, अजित राऊळ, कैवल्य पवार, प्राजक्ता आपटे, महेश बोवलेकर, प्रा.सुरेखा देशपांडे, डॉ.पूजा कर्पे, स्वप्नील वेंगुर्लेकर, राजश्री परब आदींनी कवितांचे अभिवाचन केले. पी.के.कुबल व आदित्य खानोलकर यांनी अटलजींवरील स्वरचित कविता सादर केली. लेखिका वृंदा कांबळी व किरातच्या संपादिका सीमा मराठे यांच्या ओघवत्या भाषेतील निवेदनाने कार्यक्रमाला रंगत आणली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी नगराध्यक्ष दिलीप गिरप व विश्व हिंदु परिषदेचे प्रांताचे सेवा प्रमुख डॉ. राजन शिरसाठ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारी सदस्य शरद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, उपनगराध्यक्ष शीतल आंगचेकर, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रशांत आपटे, साक्षी पेडणेकर, कृपा मोंडकर, महिला मोर्चाच्या वदा गवंडळकर, बुथप्रमुख नितीश कुरतडकर, ओंकार चव्हाण यांच्यासह अनेक काव्यरसिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page