वेंगुर्ला प्रतिनिधी- आसोली-राष्ट्रभाषा पुणे तर्फे घेतलेल्या सुबोध परीक्षेत आसोली हायस्कूल केंद्रातील इयत्ता नववीतील दिया महादेव धुरी हीने कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर स्मृती सतीश केरकर व निरज विनोद टांककर यांनी केंद्रात अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक विष्णू रेडकर, संस्थेचे सेक्रेटरी सदानंद गावडे, शिक्षक भावना धुरी, एम्.एल्.जाधव, शिक्षकेतर कर्मचारी जाधव, पाटकर व शाळेतील विद्यार्थ्यांनी, पालकांनी अभिनंदन केले.यशस्वी विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त मुख्याध्यापक विशाखा वेंगुर्लेकर यांचे मार्गदर्शन मिळाले.
