राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची प्रतिक्रिया
सावंतवाडी-: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत शिवसेना कार्यकर्त्यांवर झालेला प्राणघातक हल्ला निंदनीय असल्याचे मत सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केले आहे. या घटनेद्वारे जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असून, पोलिसांनी त्यांचा शोध घ्यावा अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला आहे.
