*⚡कणकवली ता.१८-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे खंदे समर्थक मजूर संस्था संचालक, करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. नरडवे रोड वर रेल्वे स्टेशन नजीक हा हल्ला झाला होता.हल्लेखोरांनी इनोव्हा कारने पाठीमागून ठोकर देत अपघात केला.
मोटरसायकल वरून परब खाली कोसळताच आपल्यावर धारधार सुरीने हल्ला करण्यात आला.अशी फिर्याद संतोष परब यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे.या प्रकरणी कणकवली पोलिसांत अनोळखी आरोपी विरोधात भांदवि कलम ३०७,३४ अन्वये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे करीत आहे.
