केबलमध्ये अडकला घोडा

प्राणी मित्रांनी केली सोडवणूक

मालवण दि प्रतिनिधी मालवण देऊलवाडा येथील वीज वितरण कार्यालयाच्या नजीक असलेल्या फलकाजवळ काल शुक्रवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास केबलला अडकून पडलेल्या घोड्याला मालवणातील प्राणी मित्रांनी केबलमधून सोडवत त्याला सुखरूपरित्या बाहेर काढले.

नाताळच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मालवणातील पर्यटन हळूहळू फुलू लागले असून लहान मुलाना आकर्षित करणारी घोडागाडी घेऊन परजिल्ह्यातील घोडागाडीचे व्यावसायिक मालवणात आले आहे देऊलवाडा मालवण येथे वास्तव्यास असलेल्या घोडागाडीच्या मालकांनी देऊळवाडा येथील कुंपणात गवत चरण्यासाठी सोडले होते. ते चरत असताना वीज वितरण कार्यालया नजीकच्या एका विद्युत खांबावरील तुटून पडलेल्या केबलला घोड्याचा पाय अडकला व तो घोडा नजीकच्या खड्यात पडला. तो घोडा विव्हळत असताना रस्त्यावरून जाणाऱ्या काही युवकांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी त्याला सुखरूप बाहेर काढले.

You cannot copy content of this page