मालवण परीट संघाचे आयोजन
मालवण दि प्रतिनिधी श्री संत गाडगे महाराज परीट सेवा संघ मालवण यांच्यावतीने श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त सोमवार दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता देऊळवाडा आडवण येथील श्री. उत्तम चव्हाण यांच्या निवासस्थानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी मालवण तालुक्यातील सर्व ज्ञाती बांधव व संत गाडगे महाराजांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्री संत गाडगे महाराज परीट सेवा संघ मालवणचे अध्यक्ष मोहन वालावलकर व सचिव विनायक चव्हाण यांनी केले आहे.
