गणेशनगर येथील हाय मास्टचे नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण…

नगरसेवक अँड परिमल नाईक यांनी केला पाठपुरावा…

सावंतवाडी-: नगरपालिकेच्या माध्यमातून आणि माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे मोरडोंगरी गणेश नगर येथे हायमास्ट बसवण्यात आला आहे. नगराध्यक्ष संजू परब आणि नगरसेवक अँड परिमल नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या हाय मास्टचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी गणेश नगर सोसायटीचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांच्या हस्ते हायमास्ट चे बटन दाबून हायमास्ट सुरू करण्यात आला. यावेळी सेनेच्या नगरसेविका भारती मोरे, नगरसेविका माधुरी वाडकर तसेच गणेश नगरचे रहिवासी उपस्थित होते.

You cannot copy content of this page