लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

वेंगुर्ला प्रतिनिधी– वेंगुर्ला नगरपरिषद आयोजित नगराध्यक्ष चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. तीन दिवस सुरु असलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातून आठ संघ सहभागी झाले आहेत. या उद्घाटनाचे औचित्य साधून शहरातील माजी लेदर बॉल खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. वेंगुर्ला-कॅम्प मैदानावर स्पर्धेचा शुभारंभ झाला. यावेळी उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे, श्रेया मयेकर, धर्मराज कांबळी, मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांच्यासह खेळाडू तसेच नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर वेंगुर्ला शहरातील माजी लेदर बॉल क्रिकेट खेळाडू सुरेश भोसले, बाळू खामकर, प्रकाश नाईक, बाबली वायंगणकर, प्रसन्ना कुबल, संजय पूनाळेकर, बबन नार्वेकर, राजू गवंडे, संजय परब, विनय सामंत, जयराम वायंगणकर, प्रसाद सातार्डेकर, जया चुडनाईक आदींचा नगरपरिषद मार्फत सन्मान करण्यात आला. स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर असणा-या वेंगुर्ला शहराबरोबरच, संपूर्ण जिल्ह्यातील नागरीकांपर्यंत स्वच्छतेच्या सवयीचा प्रचार व प्रसार करण्याकरीता या नगराध्यक्ष चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवार १९ डिसेंबर रोजी दुपारी होणार आहे.

You cannot copy content of this page