वजराट येथील गणेश घाटाचे भूमिपूजन

वेंगुर्ला प्रतिनिधी- वजराट-गावठणवाडी येथे मंजूर गणेश घाटाचे भूमिपूजन जिल्हा परिषद महिला व बाल विकास समिती सभापती शर्वाणी गावकर यांच्या हस्ते १६ डिसेंबर श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी सभापती गावकर यांनी १५वा वित्त आयोग स्वतःच्या शेष अनुदानातून या गणेश घाटासाठी निधी दिल्याबद्दल येथील ग्रामस्थांच्यावतीने येथील खादी उद्योजक व जेष्ठ मार्गदर्शक सुधाकर भोसले यांच्या हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सावंतवाडी भाजप तालुका उपाध्यक्ष शेखर गावकर, सरपंच महेश राणे, उपसरपंच नितीन परब, सदस्य विजय नळेकर, वजराट सोसायटी चेअरमन बाबुराव परब, तालुका चिटणीस नितीन चव्हाण, वामन भोसले, माजी सरपंच सूर्यकांत परब, विकास चव्हाण, विजय पेडणेकड, मंगेश परब, वसंत परब, सुर्या घोने, जयसिंग देसाई, सखाराम पेडणेकर यांच्यासाहित ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page