दांडेली-कोंडुरा येथे मंजूर हायमास्ट टॉवरचे भूमीपूजन

जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक यांच्या हस्ते उदघाटन

सावंतवाडी : शिवसेना खासदार श्री विनायक राऊत यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत दांडेली-कोंडुरा तिठा येथे मंजूर झालेल्या हायमास्ट टॉवरचे भूमीपूजन आज सकाळी ९.३० वाजता करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य श्री राजन मुळीक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

यावेळी सावंतवाडी युवासेना तालुका अधिकारी योगेश नाईक, पंचायत समिती सदस्य संदीप नेमळेकर, दांडेली सरपंच कृष्णा पालयेकर, आरोस सरपंच शंकर नाईक, तळवणे सरपंच विजय रेडकर ,दांडेली माजी सरपंच संजय पांगम, बाळा मोरजकर , दांडेली शाखाप्रमुख, तानाजी खोत, दांडेली युवासेना अधिकारी विनोद ठाकूर, ग्रामस्थ व व्यापारी संभाजी मुळीक, नाना मुळीक, रामदास पांगम, विजय पुनाळेकर, आनंद खोत, उमेश खोत तसेच युवासैनिक अमेय खोत, साहिल खोत आदी उपस्थित होते. हायमास्टसाठी लगेच काम सुरू करण्यात आले व लवकरात लवकर काम पूर्ण केले जाईल, असे जाहीर करण्यात आले. यामुळे दांडेली-कोंडुरा ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे

You cannot copy content of this page