मळगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा २० डिसेंबर रोजी

ग्रामसभेत विविध विषयांवर होणार चर्चा

*⚡सावंतवाडी ता.१८-:* मळगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा सोमवार २० डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता कै  उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर सभागृह येथे कोविड-१९ च्या शासन नियमावलीचे पालन करून आयोजित करण्यात आली आहे. या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे, मागील सभेत मंजूर झालेल्या ठरावाच्या अंमलबजावणीची माहिती देणे, शासनाचे महत्वाचे निर्णय, परिपत्रके, आदेश, अर्ज वाचन करणे, सर्व जमा-खर्च वाचन करणे, विविध योजनांच्या लाभार्थी निवड करणे, ग्रामपंचायतीच्या उर्वरित उपसमित्या पुनर्गठीत करणे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०२०-२१ साठी पुरवणी आराखडा व २०२१-२२ च्या मूळ आराखड्याचे वाचन करणे, ग्रामसंसाधन गट स्थापन करणे, १५ वित्त आयोग २०२०-२१ व २०२१-२२ आराखडा चर्चा करणे व २०२२-२३ आराखडा तयार करणे, ग्रामपंचायतीचे सन २०२१-२२ अंदाजपत्रक व वार्षिक अहवाल सन २०२०-२१ चे वाचन करणे, जलजीवन आराखडा तयार करणे, तंटामुक्ती अध्यक्ष निवड करणे, स्वच्छता कर बसविण्याबाबत चर्चा करणे, दलितवस्ती सुधारीत आराखडा वाचन करणे, अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे, जनसुविधा योजनेमधून २०२२-२३ आराखडा कामे सुचविणे, पाणलोट समितीविषयी चर्चा करणे आदी विषयांसह अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. सभेत कोणास सूचना अगर ठराव मांडावयाचे असल्यास त्यांनी सभेच्या दोन दिवस अगोदर ग्रामपंचायत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात किंवा इमेलवर पाठवायचे आहेत. या ग्रामसभेस मतदारांनी व ग्रामस्थांनी उपस्थित राहून सभेचे कामकाज यशस्वी करावे, असे आवाहन मळगाव ग्रामपंचायत सरपंच स्नेहल जामदार व मळगाव ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page