संतोष परब यांच्या हल्लेखोरांना कडक शासन करणार

पालकमंत्री उदय सामंत यांचा इशारा; पोलीस अधिक्षकांना केल्या सूचना

कणकवली 18 डिसेंबर (प्रतिनिधी)- संतोष परब यांच्यावर झालेला जीवघेणा हल्याचा प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे.या हल्याचा मी निषेध करतो. या हल्ल्याची माहिती मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे.जे कोण हल्लेखोर आहेत.त्यांना तात्काळ शोधून काढून त्यांच्या विरुदध कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना केल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकरांशी बोलताना दिली.

सिंधुदुर्गातील नगरपंचायत निवडणुकींच्या प्राश्वभूमीवर पालकमंत्री नाम. उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर होते.संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.काही वेळानंतर ते कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले.त्यानंतर जखमी संतोष परब यांची भेट घेत विचारपूस करत घडल्या प्रकाराबद्दल त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. तद्नंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याशी या हल्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेत काही सूचना केल्या.यावेळी आम.वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवानेते संदेश पारकर, संजय पडते, नगरसेवक सुशांत नाईक व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page