19 ते 21 डिसेंबरपर्यंत मुक्काम; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
*⚡कणकवली ता.१८-:* मालवण तालुक्यातील किर्लोस गावठाणवाडी येथील डेरवण येथे गंगेचा उगम झाला असून गंगेच्या दर्शनासाठी परिसरातील गावातील भाविकांची रीघ लागत आहे. तब्बल 35 वर्षानंतर किर्लोस गावच्या गावठणवाडीतील डेरवण येथे ही गंगा अवतीर्ण झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे .गंगास्थळी किर्लोस गावची देवराठी गंगा मातेच्या भेटीसाठी रविवार 19 डिसेंबर रोजी जात असून 21 डिसेंबरपर्यंत थांबणार आहे. मालवण तालुक्यातील किर्लोस गावात गंगा प्रकट झाल्याचे समजल्यावर अनेक भाविकांनी भेट देत गंगा मातेचे दर्शन घेतले आहे. गंगा उगमची माहिती समजताच गंगेच्या दर्शनासाठी भाविकांनी या ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली .किर्लोस गावात डेरवणे गंगेचे धरण म्हणून फार प्राचीन काळापासून प्रसिध्द आहे . गंगेचा उगम तब्बल ३५ वर्षानी होत आहे . गेले 10 ते 12 दिवस गंगेचे पाणी वाहत आहे . गुराखी एकनाथ घाडीगावकर यांनी प्रथम या गंगेचा उगम झाल्याचे समजले आणि त्यांनेच प्रथम दर्शन घेतले . त्यानंतर गावकऱ्यांनी उगम पावलेल्या गंगेचे पूजन केले . किर्लोस गावातील गंगा मातेच्या भेटीसाठी गावची देवराठी 19 ते 21 डिसेंबर या कालावधीत गंगा स्थळी थांबणार आहे .भाविकांनी यावेळी उपस्थित राहून गंगा मातेच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन किर्लोस ग्रामस्थांच्यावतीने अर्जुन उर्फ बाळा लाड यांनी केले आहे.
