*राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी केलेल्या घोषणा फसव्या

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची सावंतवाडीत टीका*

*💫सावंतवाडी-:* राज्य सरकारने शेतकऱ्यांचे फसवणूक केली आहे. त्यांनी केलेल्या घोषणापैकी एकही मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सावंतवाडी येथे केली आहे. ते आज गोवा दौर्‍यावर असताना सावंतवाडीत आले होते. तर महा विकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात बांधकाम घोटाळे झाले असून हे आपण उघडकीस आणले आहेत त्यामुळे घोटाळा करणार्‍यावर कारवाई करा अशी आपण मागणी केली असून त्यांनी कारवाई न केल्यास आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले

You cannot copy content of this page