*”त्या” कंपनी विरोधात करणार आमरण उपोषण

महाराष्ट्र माईन्स वर्कर्स युनियनचा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा;कंपनीने ९ महिन्याचे दिले नाही वेतन*

*💫सिंधूदुर्गनगरी दि.२८-:* कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील मे. चिराग सँन्डिटेक्स्ट प्रा. लि. कंपनीने मागील ९ महिन्यांपासुन कामगारांचे वेतन दिलेले नाही. त्यामुळे ५३ कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधात १२ जानेवारी २०२१ सकाळी ९ वाजल्या पासून कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना महाराष्ट्र माईन्स वर्कर्स यूनियनने सोमवारी दिले आहे. यावेळी अध्यक्ष रामचंद धुरी, सरचिटणीस विजय सावंत, खजिणदार संजय तेली यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. देण्यात आलेल्या निवेदनात मे. चिराग सँन्डिटेक्स्ट प्रा. लि. कंपनीत गेली अनेक वर्षे आम्ही काम करीत आहोत. कंपनीच्या चांगल्या वाईट काळात आम्ही कायमच कंपनी सोबत राहिलो आहोत. मात्र कोरोनाचे कारण सांगून गेले ९ महीने आम्हाला कंपनी व्यवस्थापन अथवा मालक यानी पगार दिलेले नाहीत. जगात कोरोना महामारिचे संकट आहे. त्यातच पगार न दिल्याने आमच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत लक्ष घालण्यासाठी यापूर्वी जिल्हाधिकारी या नात्याने आपल्याला लेखी पत्र दिले होते. परंतु आता आमची सहनशीलता संपली आहे. कामगारांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनीच्या व्यावस्थापनाने आम्हाला न्याय हक्कासाठी आंदोलन करण्याची वेळ आणली आहे. त्यामुळे १२ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ९ वाजल्या पासून आम्ही कंपनीच्या गेटसमोर आमरण उपोषण छेडणार आहोत, असे नमूद केले आहे.

You cannot copy content of this page