जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या उपस्थितीत प्रवेश
*💫सावंतवाडी दि.२८-:* आंबोली गावातील ग्रामस्थांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे व तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अॅड. दीलीप नार्वेकर, शहरअध्यक्ष अॅड. राद्यवेंद्र नार्वेकर, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष अशोक राऊळ, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष सच्चीदानंद बुगडे, संदीप कोठावळे, किरण गावडे, दिगंबर वरक आदी उपस्थित होते. आंबोली गावातील गणपत धोंडू पाटील, अरूण जनार्दन चव्हाण, यशवंत गोपाळ सावंत, कृष्णा मारूती पाजरे, सुनील जनार्दन चव्हाण आदींनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रवेशकर्त्यांचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले.
