संजू विर्नोडकर टिमतर्फे बांदा शहर परिसरात निर्जंतुकीकरण

*बांदा सरपंच अक्रम खान यांनी केली प्रशंसा

*💫बांदा दि.२८-:* बांदा शहरातील एकाच परिवारात तीन कोविडबाधित सापडल्याने ईतरत्र बाधा होवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संजू विर्नोडकर टिमच्यावतीने त्यांची दोन्ही घरे आतुन बाहेरुन संपुर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आली. तसेच स्वच्छतागृह, परिसर, समोरील रस्ते, दुकाने यावरही कोरोनाप्रतिबंधक फवारणी करण्यात आली. मार्च महिन्यापासून आतापर्यंत अविरत व चिकाटीने कोरोना महामारीत कार्य करणाºया संजू विर्नोडकर टिमची बांदा सरपंच अक्रम खान यांनी प्रशंसा करुन बांदा वासियांतर्फे आभार मानले. यात सागर मळगावकर व ईतरांनी सहभाग घेतला.

You cannot copy content of this page