मालवणी बझार संस्थेला नाबार्ड अधिकाऱ्यांची भेट

*⚡मालवण ता.२१-:* मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लि. मालवण संचलित मालवणी बझार मालवण या डिपार्टमेंट स्टोअर्सला नाबार्ड पुणे चे असिस्टंट मॅनेजर श्री. प्रेमचंद, नाबार्ड जिल्हा प्रबंधक अजय थुटे यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी त्यांनी संस्थेच्या सहकार क्षेत्रातील कामकाजाविषयी माहिती घेऊन समाधान व्यक्त करत संस्थेचा हा ग्राहक सेवेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी श्री. प्रेमचंद व अजय थुटे यांनी मालवणी बझार मालवण, या संस्थेचे कामकाजाविषयी, बझारमधील ग्राहक सेवा, फिरत्या बझारची सेवा, बारकोड स्टॉक पद्धती याविषयी माहिती जाणून घेतली व संस्थेस मार्गदर्शन केले. संस्थेच्या ग्राहकांसाठी असलेल्या सोडॅक्सो सेवा, स्वाईप सेवा, डिस्काउंट कार्ड सेवा, भेट योजना या योजनांविषयी समाधान व्यक्त केले. संस्थेला सुसज्ज गोदामसाठी, संस्थेच्या व्यवसाय वाढीसाठी नाबार्डकडील योजनाविषयी संस्थेला माहिती दिली. त्याचप्रमाणे संस्थेच्या पुढील व्यवसायिक धोरणाविषयी माहिती जाणून घेऊन त्याबाबत मार्गदर्शन केले. संस्थेने आजपर्यंत केलेली प्रगती व यापुढे धोरणात्मक प्रगती यासाठी त्यांनी संस्थेला सहकार्य व शुभेच्छा दिल्या. संस्थेने शहराच्या ठिकाणी निर्माण केलेली मोठया स्वरूपातील स्थावर मालमत्ता व या मालमत्तेसाठी घेतलेल्या कर्जाची वेळीच करत असलेली परतफेड याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्या समवेत सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सरव्यवस्थापक (लेखा) श्री. डि. के. पडेलकर, उप सरव्यवस्थापक श्री. डि. आर. लोकेगांवकर, बँक विकास अधिकारी श्री. विश्वनाथ डोर्लेकर, बँक इन्स्पेक्टर श्री. पूर्णानंद सरमळकर, श्री. सुरज गवंडी, संस्थेचे संचालक श्री. पी. एल. मोहिते, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी. व्ही. परब व संस्थेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page