जात प्रमाणपत्राबाबतच्या अडचणी मांडण्याचे गाबीत समाज बांधवांना आवाहन

*⚡मालवण ता.२१-:* गाबीत समाज बांधवांना जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी साठी अनेक अडचणी येत असल्याने जात प्रमाणपत्राबाबतच्या समस्या व तक्रारी अखिल भारतीय मच्छीमार गाबीत महासंघाच्या शिष्टमंडळाकडे मांडाव्यात, असे आवाहन महासंघाचे युवक प्रमुख प्रसाद बापर्डेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. गाबीत समाजातील मुलांना जातीचे प्रमाणपत्र तसेच जात पडाळणीसाठी बऱ्याच अडचणी येत असून त्यांची प्रकरणे पुराव्या अभावी निकालात काढून त्यांची निराशा होत आहे. यामुळे शाळेतील सवलती पासून वंचित राहव लागत असून काहींना नोकऱ्या भरती प्रमोशन होत नाहीत. याबाबत बऱ्याच तक्रारी येत असल्याने अखिल भारतीय मच्छीमार गाबित समाज महासंघाचे सरचिटणीस सुरेश बापर्डेकर यांनी त्वरित मीटिंग घेऊन होणाऱ्या समस्यांवर कशाप्रकारे तक्रारीचे निवारण करावे याबाबत विचार विनिमय होऊन सर्वानुमते ठरविण्यात आले. त्यानुसार गाबित समाजातील ज्या बांधवांना जातीचे प्रमाणपत्र ,जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविताना जे जे अडचणींना आणि समस्यांना सामोरे जावे लागले त्यांनी आपल्या ज्याकाही तक्रारी असतील त्या लेखी निवेदनाद्वारे दि. २५ नोव्हेंबर पर्यंत द्याव्यात .त्यात आपला संपर्क क्रमांक नमूद करावा. त्यानंतर शिष्टमंडळ आपली बाजू मांडण्याकरिता संबधित अधिकारी यांची भेट घेऊन समस्या मांडणार आहेत. तरी समाज बांधवांनी सुरेश बापर्डेकर, मु.पो.तारकर्ली तसेच महासंघाचे अध्यक्ष श्री.शंकर पोसम ९९६९९७००५६, सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख श्री.विजय राऊळ ९४२३५११८२२, मालवण प्रमुख श्री.बबन कोयंडे ९४२३८३४८९७, वेंगुर्ले प्रमुख श्री.दाजी जुवाटकर ८२६२०३०४७७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अखिल भारतीय मच्छीमार गाबित समाज महासंघाचे युवक प्रमुख प्रसाद बापर्डेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page