केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे बांद्यात स्वागत

*⚡बांदा ता.२१-:* सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री ना. नारायण राणे यांचे बांदा येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. आडाळी एमआयडीसी क्षेत्रात उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करुन रोजगारनिर्मिती करण्याबाबत यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी चर्चा केली. यावेळी बांदा मंडळ तालुकाध्यक्ष महेश धुरी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, बांदा विभागीय अध्यक्ष गुरुनाथ सावंत, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष संदिप बांदेकर, ज्ञानेश्वर सावंत, शहर अध्यक्ष राजा सावंत, माजी ग्रा. पं. सदस्य हुसेन मकानदार, युवा शहर अध्यक्ष साई सावंत, सिद्धेश शेवडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page