ग्रा.पं.सदस्य मनीषा परब : आरोस धनगरवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
*⚡बांदा ता.२१-:* ग्रामीण भागातील शेतकरी, गरीब होतकरू मजूर लोक आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी कायम धडपडत असतात. शिक्षण ही काळाची गरज असून अशा गरीब व होतकरू मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात अजून पुढे नेण्यासाठी त्यांना एका मदतीचा हात म्हणून नीलेश परब मित्रमंडळ मुंबई यांनी शैक्षणिक साहित्य वाटपाचा घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन, आरोस ग्रामपंचायत सदस्य मनीषा परब यांनी केले. आरोस धनगरवाडी शाळेत नीलेश ऊर्फ बाळा परब मित्रमंडळ मुंबई व विजय सोनावळे यांच्या सौजन्याने मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. व्यासपीठावर आरोस शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष बाळा परब, ज्येष्ठ नागरिक रमेश परब, मित्रमंडळाचे सदस्य राजन परब, नंदू परब, शाळेचे मुख्याध्यापक अनिल वरक, उपशिक्षक होंडे सर व धनगरवाडी येथील ज्येष्ठ महिला व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील मुलांच शिक्षण पूर्ण होण्यासाठी अनंत अडचणी येतात. त्यातील प्रामुख्याने म्हणजे मुलांच्या पालकांची आर्थिक बाजू. मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी पालक शेतात राबून पैसे जमा करतात परंतु ते अपुरे पडतात. अशा विद्यार्थ्यांना आम्ही कायम सहकार्य करणार असल्याचे राजन परब यांनी सांगितले. मुख्याध्यापक अनिल वरक यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले तर राजन परब यांनी उपस्थितांचे आभार मानले.
