कणकवलीत रिक्षा, सहा सीटर, मॅजिक बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याच्या प्रकाराचा केला निषेध

*⚡कणकवली ता.२१-:* महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शासन सेवेत विलीनीकरणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला रिक्षा चालक मालक संघटनेने पाठिंबा जाहीर करत कणकवली शहरातील रिक्षा चालक-मालक यांच्या सोबत खाजगी प्रवासी वाहन, सहा सीटर, मॅजिक यांनीही सहभागी होत पाठिंब्यासाठी 21 नोव्हेंबर रोजी बंद पाळण्यात आला. हा बंद 100 टक्के यशस्वी ठरला आहे.सहा सीटर मॅजिक संघटना,खाजगी प्रवासी वाहतूक तसेच ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना कणकवली यांनी बंद मध्ये सहभागी घेत एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला. यावेळी अण्णा कोदे, बाळा वराडकर, महेश आंबडोसकर, संजय मालंडकर ,संतोष सावंत, राजू पवार, विनायक पाटील ,मनोज वारे, मिलिंद सावंत, महेश झगडे ,सचिन बांदिवडेकर, व सर्व रिक्षा चालक मालक उपस्थित होते एसटी कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत फारच कमी पगार आहे. त्यामुळे शासन सेवेत विलीनीकरणासाठीची कर्मचाऱ्यांची मागणी रास्त आहे. या मागणीला पाठिंबा देण्याच्या अनुषंगाने 21 रोजी हा बंद पाळावा, असे आवाहन करण्यात आले होते. रिक्षा चालक मालकांसोबत खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने, सहा सीटर, मॅजिक यांनीही यात सहभागी व्हावे. एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी, आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत हे दाखविण्यासाठी 21 रोजी हा बंद पाळावा, असे आवाहन रिक्षा चालक मालक संघटनेच्यावतीने अण्णा कोदे, संतोष नाईक व बाळा वराडकर यांनी केले होते. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवणारे पत्र सादर करण्यात आले यात ते म्हणतात ,महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सर्व पदाधिकारी , अधिकारी , कर्मचारी यांनी गेले काही दिवस आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या कामबंद अंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालक मालक यांचा जाहीर पाठींबा आहे . तसेच अतिश्रम करणाऱ्या व जिवाची बाजी लावून जनतेची सेवा करणाऱ्या कर्मचारी वर्गाचे दडपशाहीच्या मार्गाने निलंबन करून लोकशाहीच्या मार्गाने चालणारे आंदोलन चिरडून टाकण्याच्या प्रकार हा अत्यंत निंदनीय व चीड आणणारा आहे याचा सिंधुदुर्ग जिल्हा, कणकवली तालुका चालक मालक संघटना तीव्र शब्दात निषेध करत आहे मायबाप सरकारला आई भवानी व श्री देव विठू माऊली एस . टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी बुद्धी देवो अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

You cannot copy content of this page