माळगाव हूमरोसवाडी येथील रस्त्याचे शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते भूमिपूजन…

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील माळगाव हुमरोसवाडी येथील १० लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. माळगाव हुमरोसवाडी येथील रस्त्यासाठी पुरहानी योजनेअंतर्गत दहा लाख रुपयाचा निधी मंजूर झाला यासाठी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा केला होता या कामाचे भूमिपूजन शनिवारी आमदार शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. रस्त्याचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले त्याचबरोबर बिळवस येथील शिवसेना शाखा नामफलकाचे अनावरण आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माळगाव येथे युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, पराग नार्वेकर, किरण प्रभू गुरु परब, किशोर कासले, अमित परब, मंगेश परब, अनिल परब, पांडुरंग परब, बिळवस येथे विभागप्रमुख राजेश गावकर शाखाप्रमुख रामचंद्र पालव, राहुल सावंत. उपशाखाप्रमुख रमेश फणसे, हेमंत पालव, कुणाल पालव, आदित्य सावंत, सूर्यकांत पालव, अशोक पालव, भावेश पालव, चेतन पालव, महेश फणसे, महादेव पालव, मोहन पालव, श्रीकृष्ण रेडकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page