समर्थ भावे,सायली घारे, संजय साटम, यांनी पटकावले सुवर्ण पदक
*⚡देवगड ता.२१-:* इंडीयन पॉवर लिफ्टिंग फेडरेशन ने हैदराबाद येथे नॅशनल पॉवर लिफ्टिंग चैंपियनशिप २०२१ ही स्पर्धा १७ नोव्हे.ते २० नोव्हे. २०२१ या कालावधीत संपन्न होऊन देवगड मधील वायंगणकर्स व्यायाम शाळेतील मुलांनी या स्पर्धेत आपले शक्ति प्रदर्शन दाखवत राष्ट्रीय स्तरावर विजेती पद प्राप्त करून देवगड तालुक्याचे नाव उंचीवर नेले आहे. ऑक्टोबर महिन्यात पनवेल येथे राज्य स्तरावर झालेल्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये यश मिळवल्यानंतर या स्पर्धकांची निवड हैदराबाद येथे होणाऱ्या नॅशनल लेवल स्पर्धेत झाली होती. सर्व स्पर्धकांनी गेला एक महीना वायंगणकर्स जिम मध्ये गणेश वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष रूपी मेहनत घेत पावर लिफ्टिंग ची पूर्व तयारी केली होती. तर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सर्वांनी हैदराबाद मध्येही आपला जलवा दखवून दिला. हैदराबाद येथे झालेली ही स्पर्धा इक्विप आणि अनइक्विप अशा दोन प्रकारात पार पडली. तर, या दोन्ही प्रकारात भाग घेऊन या स्पर्धकांनी घवघवीत यश प्राप्त केले. 1) संजय पुंडलिक साटम (मास्टर II ) याने ९३ किलो वजनी गटामध्ये अनइक्विप प्रकारात एकूण ४६७.५किलो वजन उचलून सुवर्ण पदक प्राप्त केले. २) समर्थ प्रकुल्ल भावे (सबज्युनिअर) याने ९३ किलो वजनी गटात अनइक्विप प्रकारात एकूण ४६७.५ किलो वजन उचलून रौप्य पदक प्राप्त केले तर, इक्विप प्रकारात एकूण ५१० किलो वजन उचलून सुवर्ण पदक प्राप्त करत समर्थ प्रफुल्ल भावे ने दुहेरी विजेते पद मिळवले. 3) सायली महेश घारे (ज्युनिअर) हिने ५७ किलो वजनी गटात अनइक्विप प्रकारात एकूण २६५किलो वजन उचलून सुवर्ण पदक मिळवले तर, इक्विप प्रकारात २५७.५ किलो वजन उचलून कांस्य पदक प्राप्त करत सायली ने दुहेरी विजेते पद मिळवले. ४) सृष्टी सुधाकर राणे (ज्युनिअर) हिने ४७ किलो वजनी गटात अनइक्विप प्रकारात एकूण २२२.५किलो वजन उचलून रौप्य पदक तर, इक्विप प्रकारातही एकूण २२२.५ किलो वजन उचलून रौप्य पदक प्राप्त करत सृष्टी ने दुहेरी विजयी संगम मिळवला. ५) ऋषीकेश सचिन तेली (सबन्युनिअर) ८३ किलो वजनी गटात अनइक्विप प्रकारात एकूण ४३५ किलो वजन उचलुन चतुर्थ क्रमांक प्राप्त केला आहे. ६) साहील आनंद मोर्ये (सबज्युनिअर) याने ५९ किलो वजनी गटात अनइक्विप प्रकारात एकूण ३१५ किलो वजन उचलून नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सहावा क्रमांक प्राप्त केला आहे. ७) श्रीराज मंगेश भडसाळे (सबज्युनिअर) याने ६६ किलो वजनी गटात अनइक्विप प्रकारात एकूण ३२७.५ किलो वजन उचलून नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत स्पर्धेत सहावा क्रमांक प्राप्त केला आहे. या स्पर्धेमध्ये वायंगणकर्स जिम मधील सात स्पर्धक सहभागी झाले होते तर त्यांनी तब्बल आठ पदक जिंकून देवगड तालुक्याचे शक्ति प्रदर्शन नॅशनल लेवल वर सादर केले आहे. वायंगणकर्स जिम चे संचालक, प्रशिक्षक आणि नॅशनल लेवल पॉवर लिफ्टर गणेश वायंगणकर यांच्या मार्गदर्शनखाली प्रशिक्षण घेत असलेल्या सर्व स्पर्धकांच्या या मेहनतीचे फळ मिळाल्या बद्दल वायंगणकर्स जिम व सर्व स्पर्धकांचे देवगड मधून अभिनंदन केले जात आहे.
