*⚡सावंतवाडी ता.१७-:* सावंतवाडी येथील इस्वटी महापुरुष मंदिर सबनीसवाडा येथे १८ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता श्रीदेवी माऊली दशावतार नाट्यमंडळ इन्सुली यांचा संत सखूच्या जीवन चरित्रावर आधारीत ‘संत सखूसाठी देव सखू झाला’ हा ट्रिकसिनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. या नाट्यप्रयोगात संतोष मेस्त्री, परशुराम मोरजकर, सुशील रेडकर, विलास परब, प्रदीप नाईक, सागर गावकर देवेश कुडव, मदन भैरवकर, रजत घाडी आणि संत सखूच्या खास भूमिकेत देवेंद्र भैरवकर आदी कलाकार सहभागी होणार आहेत, तर त्यांना हार्मोनियम-सचिन पालव, पखवाज-सागर मेस्त्री, तालरक्षक- शंकर गावकर आदी संगीतसाथ करणार आहेत
सावंतवाडी येथे १८ नोव्हेंबर रोजी ‘संत सखूसाठी देव सखू झाला’ नाट्यप्रयोग
