कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांना मातृशोक

*⚡कणकवली ता.१८-:* कणकवली नगर पंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मातोश्री लक्ष्मी अनंत नलावडे (वय ८०) यांचे गुरुवारी सकाळी ९ वा. वृद्धापकाळाने निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या राजकीय वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कणकवलीच्या नगरसेवका सुप्रिया नलावडे यांच्या त्या सासू होत. लक्ष्मी नलावडे यांच्यावर आज दुपारी साडेबारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

You cannot copy content of this page