शिवसेना नेते संदेश पारकर यांचे शिवसैनिकांना आवाहन
*⚡कणकवली ता.१७-:* शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे आम्ही शिवसैनिक आहोत. जनतेवर होणार्या अन्यायाविरोधात लढा देणे हा शिवसैनिकांचा बाणा असून बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले लोकाभिमुख कार्य तुम्ही-आम्ही एकत्रिरित्या करूया आणि शिवसेनाप्रमुखांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवूया, असे आवाहन शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या जुन्या शाखेत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करून शिवसेनेच्या स्थानिक नेते, पदाधिकारी व शिवसैनिकांनी अभिवादन केले. या प्रसंगी श्री. पारकर बोलत होते. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत-पालव, अनिल हळदिवे, नगरसेवक कन्हैया पारकर, सुशांत नाईक, अॅड. हर्षद गावडे, अनुप वारंग, भालचंद्र दळवी, कणकवली शहरप्रमुख शेखर राणे, कलमठ उपसरपंच वैदेही गुडेकर, आशियेच्या माजी सरपंच रश्मी बाणे, संजना कोलते, शोभा बागवे, दिव्या साळगावकर, रुपेश आमडोसकर, विलास गुडेकर, सुशांत दळवी, ललिल घाडीगांवकर, कलमठचे माजी सरपंच निसार शेख, कलमठचे ग्रा.पं. सदस्य बाळू मेस्त्री, रोहित राणे, रिमेश चव्हाण, दीपक गुरव, मंगेश सावंत, सुदाम तेली, बाळू पारकर, दामू सावंत, दादा भोगले, काका राणे, योगेश मुंज, दया कुडतरकर, शरद सरंगले, राजू राणे, महेश आदीसह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी शिवसेनाप्रमुखांना वंदन करत शिवसैनिकांनी त्यांना अभिवादन केले.
