एस.टी. कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे न घेतल्यास भाजपा आंदोलन छेडणार

कणकवली तालुका भाजपचा विभाग नियंत्रकांना इशारा

*⚡कणकवली ता.१७-:* एस.टी.तील सर्व संघटनेतील कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पूकारलेला संप आहे . असे असताना एस. टी. कर्मचाऱ्यांचे निलंबन करून एक प्रकारे भितीचे वातावरणे निर्माण करून दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे सदरचे केलेले अन्यायकारक निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे अन्यथा त्यांच्या न्याय मागणीसाठी भाजपाच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विभागीय नियंत्रक कणकवली विभाग याना कणकवली तालुका भाजपच्यावतीने देण्यात आला आहे. निवेदन सादर करताना माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत, भाजपा कणकवली तालूकाध्यक्ष मिलींद मेस्त्री,पं.स कणकवली सभापती मनोज रावराणे, माजी सभापती दिलीप तळेकर,भाजपा कणकवली शहर अध्यक्ष सुरेंद्र ( अण्णा ) कोदे यांच्यासह वागदे माजी सरपंच संदीप सावंत, वागदे माजी उपसरपंच लक्ष्मण घाडीगावकर, रविंद्र सांगेलकर,रघुनाथ चव्हाण, पप्पू पुजारे,सागर राणे, संदेश आर्डकर ,गोविनाथ सावंत,राजेश दिलीपकुपार जाधव, बबलु सावंत व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनात ते म्हणतात,8 नोव्हेंबर 2021 पासून सुमारे 10 दिवस एस.टी चे कर्मचारी यांनी त्यांच्या गेली अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी स्व्यंस्फूर्तीने संप सुरू केलेले आहे . सदर संप हा लोकशाही मार्गाने सुरू असताना तसेच शांततेत सुरू व जिल्हयातील जवळपास 17 कर्मचाऱ्यांचे आपल्या कार्यालयाकडून निलंबन करण्यात आले असून कणकवलीतील 5 अन्यायकारक निलंबन करून त्यांचेवर मोठा अन्याय कलेला आहे . सदरचा संप कोणत्याही एस.टी संघटनेचा नसून तसेच त्या संपात कोणत्याही संघटनेचे पदाधिकारी नसून सर्व संघटनेतील कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पूकारलेला संप आहे . असे असताना एस टी कर्मचाऱ्यांमध्ये सदरचे निलंबन करून एक प्रकारे भितीचे वातावरणे निर्माण करून दबाव तंत्राचा वापर करणेत येत आहे असे दिसून येते . त्यामुळे आपण सदरचे केलेले अन्यायकारक निलंबन तात्काळ मागे घेणेत यावे . अन्यथा त्यांचे न्याय मागणीसाठी भाजपाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी . असे नमूद करतानाच गितेश कडू यांच्यावर कारवाई का झाली नाही ,याचाही जाब विचारण्यात आला. 25 तारीख पर्यंत कारवाई न झाल्यास 25 रोजी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशाराही देण्यात आला

You cannot copy content of this page