कै. सत्यविजय भिसे यांच्या स्मृती दिनानिमित्त २२ नोव्हेंबर रोजी शिवडाव येथे रक्तदान शिबीर

*⚡कणकवली ता.१७-:* कणकवली तालुक्यातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते कै. सत्यविजय भिसे यांचा १९ वा स्मृतीदिन सोमवार २२ नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार आहे. त्यातील एका उपक्रमाअंतर्गत शिवडाव येथील कै.सत्यविजय भिसे मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गेली १९ वर्षे कै. सत्यविजय भिसे यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून अनेक सेवाभावी व सामाजिक उपक्रम राबविले जातात. यामध्ये रक्तदान शिबिर, वारकरी संप्रदायाच्या वारकरी मंडळींचे सत्कार, रुग्णांना फळं वाटप आदी कार्यक्रम घेतले जातात. या वर्षी सोमवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता बाळा भिसे निवास, शिवडाव येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरास सर्व रक्तदात्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सत्यविजय भिसे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page