भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते वादळग्रस्तांना मदत
*⚡वेंगुर्ले ता. १७-:* मंगळवारी झालेल्या वादळामुळे मठ गावातील सतयेवाडी , मठकर वाडी , बोवलेकर वाडी व गावठणवाडी येथे घरावर झाडे व माड पडुन भरपूर नुकसान झाले . अचानक आलेल्या सोसाट्याच्या वारयामुळे ग्रामस्थांची अपरिमीत हानी झाली . आंब्याची झाडं पडुन नुकसान झाले तसेच घरे व गुरांचे गोठे यांच्यावर झाडे कोसळून गोरगरीब लोकांचे बरेच नुकसान झाले नुकसानीची माहिती मिळताच भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी तातडीने भेट दिली , तसेच नुकसान झालेल्या प्रत्येक वाडीत जाऊन नुकसानग्रस्ताना ताडपत्री दिली . यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , मठ सरपंच तुळशीदास उर्फ दादा ठाकुर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , युवा नेते अजित नाईक , शक्ती केंद्र प्रमुख विजय बोवलेकर , बुथप्रमुख अनिल तेंडोलकर , रा.स्व.संघाचे ओंकार मराठे , सुनील तेंडोलकर , संतोष परब , महेश धुरी , रविंद्र खानोलकर , अमोल ठाकुर , शेखर गावडे , नितीश कांबळी , किशोर पोतदार , केशव ठाकुर , गजा मांजरेकर इत्यादी भाजपा कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते . यावेळी खालील ग्रामस्थांना ताडपत्र्यांचे वाटप करण्यात आले . *सतयेवाडी* – निलेश गावडे , बाबा गावडे , सुनील गावडे , दिनेश गावडे , कानु गावडे , शेखर गावडे , ओंकार मराठे . *मठकरवाडी*- अनिल मठकर . *बोवलेकर वाडी*- दशरथ दाभोलकर , भुषण बोवलेकर , चंद्रकला बोवलेकर . *गावठणवाडी*- दादु गावडे , सुनील तेंडोलकर .
