नगराध्यक्ष चषक‘ क्रिडा सप्ताहाचे उद्घाटन

*⚡वेंगुर्ला ता.१७-:* वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत १७ ते २१ नोव्हेंबर कालावधीत आयोजित केलेल्या ‘नगराध्यक्ष चषक‘ स्वच्छता क्रिडा सप्ताहाचे उद्घाटन नगरपरिषदेच्या कॅम्प येथील एकलव्य नेमबाजी प्रशिक्षण केंद्र येथे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते रायफल शुटींग करुन झाले. यावेळी उपनगराध्यक्ष शीतल आंगचेकर, नगरसेवक साक्षी पेडणेकर, प्रशांत आपटे, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, उपरकर नेमबाजी प्रशिक्षण केंद्राचे संचालक कांचन उपरकर, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी आणि खेळाडू उपस्थित होते. मागील दोन वर्षात कोरोनामुळे खेळाडू खेळापासून वंचित राहिल्याने त्यांच्यात निर्माण झालेली नकारात्मक भावना दूर करण्यासाठी अशाप्रकारच्या क्रीडा स्पर्धा उपयोगी ठरणार असल्याचे मनोगत नगराध्यक्ष गिरप यांनी व्यक्त केले. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील पदत विजेते खेळाडू सहभागी झालेले असून ही स्पर्धा ओपन साईट, पीट साईट व पिस्टल अशा एकूण तीन प्रकारात पार पडणार आहे.

You cannot copy content of this page