ह्युमन राईट्सचा एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा

*⚡देवगड ता.१७-:* इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स अँबासँडर्स ऑर्गनायझेशन देवगड तालुका या संस्थेच्या वतीने रापम देवगड आगारातील कामगार बंधूंच्या बेमुदत संपास पाठींबा व्यक्त करून एस टी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असल्याचे सांगितले .यावेळी उपाध्यक्ष विलास रुमडे,मीडिया अध्यक्ष दयानंद मांगले यांनी कामगार वर्गासमोर विचार मांडले.या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचेकडे लेखी पत्र देवगड तहसीलदार यांचे मार्फत देण्यात आले. या पत्रात नमूद केलेप्रमाणे एसटी कर्मचारी यांनी न्याय मागणी करीता केलेल्या संपास आपला पाठींबा असून राज्य सरकारमध्ये या कामगारांचे विलीनीकरण करण्यात यावे .तसेच संपकाळात ज्या कामगारांवर निलंबन करण्यात आले ते निलंबन मागे घेऊन संप मिटवावा .व एसटी च्या प्रवासी फेऱ्या नियमित सुरळीत पणे सुरू करण्यात याव्या .व प्रवासी वर्गाची सोय करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे . यावेळी संस्थेचे अध्यक्ष दयानंद तेली,प्रदेश सरचिटणीस विनोद पटेल,सरचिटणीस रविंद्र कांदळगावकर,उपाध्यक्ष विलास रुमडे ,मीडिया अध्यक्ष दयानंद मांगले,सहसचिव रविंद्र चिंदरकर,सदस्य नंदकुमार परब,रवी चांदोस्कर,उमेश कुबडे,पद्माकर राऊत, गिरीश धोपटे,उद्धव गोरे उपस्थित होते.

You cannot copy content of this page