मोठेवाडा आत्मेश्वर मंदिराचा कलशारोहन उद्या

भाविकांना उपस्थित राहण्याचे स्थानिक सल्लागार समितीचे आवाहन

सावंतवाडी : संस्थानकालीन माठेवाडा येथील ऐतिहासिक श्री देव आत्मेश्वर मंदीराचा कलशारोहण सोहळा कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेस गुरूवारी १८ नोव्हेंबरला पार पडणार आहे. स. ८.३० वा. धार्मिक कार्यक्रम, देहशुद्धी, प्रायश्चित्त, देवता वंदन, गणपती पुजन, पुण्याह वाचन, नांदी श्राद्ध, संभारदान व नंतर प्राकारशुद्धी, उदकशांत, कलशुद्धीकरण, नवग्रहस्थापन, अग्नीस्थापन, पूर्णाहूती आदी कार्यक्रम मिलिंद चोणकर, मानसी चोणकर यांच्या हस्ते स. ८.३० वा. होणार आहे. दु. १२.४० ला कलशारोहण, १. वा महाआरती, प्रार्थना, १.३० वा. महाप्रसाद, ४.३० वा.‌ सुश्राव्य भजन, सायं. ६.३० वा. दीपोत्सव आदि कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन माठेवाडा मित्रमंडळ व श्री देव आत्मेश्वर स्थानिक सल्लागार उपसमितीकडून करण्यात आल आहे.

You cannot copy content of this page